Site icon swamisamarthsevekari.com

Gurucharitra Adhyay 14 pdf / श्री गुरुचरित्र १४ वा अध्याय मराठी Pdf Download

Spread the love
Gurucharitra Adhyay 14 pdf

Table of Contents

Toggle

Gurucharitra Adhyay 14 pdf या अध्यायाच्या उपासनेविषयी काही मार्गदर्शक सूचना-

१) श्रीदत्तात्रेय महाप्रभू आणि श्रीगुरू नृसिंहसरस्वती स्वामी महाराज हे भक्तवत्सल, भक्ताभिमानी, भक्तांचे संरक्षण व त्यांचे सर्वतोपरी कल्याण करणारे, दीनआर्ताच्या मदतीला तात्काळ धावून जाणारे, अत्यंत उदार आणि कृपावंत आहेत. या उपासनेने ते आपली अडचण दूर करून आपले मनोरथ निश्चित पूर्ण करतील अशी अतूट श्रद्धा व दृढतर विश्वास ठेवावा.

२) ही उपासना म्हणजे श्रीगुरूंची नित्य प्रेमाने करावयाची पठणरूपी सेवा आहे हे लक्षात घेऊन ती भक्तीने, तत्परतेने व वेळेवर करावी. तीत आळस व यांत्रिकपणा नसावा.

३) ही उपासना सहा महिने नित्यनेमाने करावयाची आहे. गुरुवारी उपवास करणे बंधनकारक नाही. कोणाला श्रीगुरूंप्रीत्यर्थ उपवास करावा असे वाटत असेल तरच करावा.

४) दिनशुद्धी पाहून कोणत्याही गुरुवारी उपासनेस आरंभ करावा.

५) उपासनेचा ‘संकल्प’ पहिल्या दिवशी करावा. तो संकल्प कसा करायचा ते याच पुस्तिकेत अन्यत्र दिले आहे.

६) ही उपासना बारा वर्षांवरील कोणतीही व्यक्ती, कुमार, कुमारी, प्रौढ स्त्रिया व पुरुष, पति-पत्नी उभयता वा दोघांपैकी कोणीही एकाने, तसेच वृद्ध माणसे यांनी करावी.

७) उपासनाकाळात शुचिर्भूत असावे, सदाचाराने वागावे, परनिंदा, दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन करणे,

वादविवाद करणे, अधर्माने वागणे, अपशब्द उच्चारणे, लबाडी करणे, हिंसा करणे, उलटून बोलणे या गोष्टी टाळाव्यात.

८) श्रीगुरू उपासकावर व त्याच्या परिवारावर कृपा करून सर्वांचेच कल्याण करतात हे लक्षात घेऊन कुटुंबियांनी उपासना कर्त्यास सर्वतोपरी साह्य करावे.

९) उपासनेची वेळ आपल्या सोईनुसार असली तरी त्या वेळेचे बंधन पाळावे. अर्थात उपासना ठरल्या वेळी करावी. आपल्या संकल्पानुसार उपास्य देवता या निश्चित वेळी उपासनेच्या जागी सूक्ष्म रूपात उपस्थित असते हे लक्षात घ्यावे. वेळेचा नियम पाळल्याने उपासनेत एक प्रकारची शिस्त येते.

१०) स्त्रियांच्या बाबतीत उपासनेच्या कालावधीत मासिक अडचण आल्यास उपासना करू नये.

११) शहरांतील घरांमध्ये देवांसाठी स्वतंत्र खोली नसते, तसेच स्त्रियांच्या मासिक अडचणीच्या काळात शिवाशिवही पाळले जात नाही. अशा वेळी घरातील कर्त्या स्त्रीला अडचण आल्यास पुरुष उपासकानेही तितके दिवस उपासना करू नये. त्यानंतर सर्वत्र गोमूत्र शिंपडून नित्याप्रमाणे उपासना करावी.

१२) सोहेर, सुतक, स्वतःचे आजारपण, अनिवार्य प्रवास-प्रसंग महापुरासारखी सार्वजनिक आपत्ती तसेच स्त्रियांच्या बाबतीत मुलांचे आजार आदी अनेक कारणांनी उपासनेमध्ये खंड पडू शकतो. अशावेळी आधी केलेल्या उपासनेचे पुण्य फुकट जात नाही. परिस्थिती अनुकूल होताच संकल्पित उपासना पूर्ववत चालू ठेवावी.

१३) उपासनाकाळात एकादशी, महाशिवरात्र यासारखा पूर्ण उपवासाचा दिवस आल्यास नेहमीप्रमाणे उपासना करावी. पण श्रीदत्तात्रेयांना दूध, खडीसाखर, पेढे वा फळांचा नैवेद्य दाखवावा.

१४) उपासनेत शक्यतो खंड पडू देऊ नये; पण काही कारणास्तव उपासनाकार्यात उपासना करता येणे शक्य नसेल तर श्रीगुरू दत्तात्रेयांना आपली अडचण सांगून क्षमा मागावी आणि त्याच्याऐवजी त्याची पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडिल, भाऊ किंवा बहिण यांच्यापैकी कोणीही ती पठणरूपी सेवा उपासना करावी.

१५) उपासनेस बसण्यापूर्वी घरातील देवांची नित्यपूजा झालेली असावी.

१६) ज्या इष्ट कार्यसिद्धीसाठी आपण ही काम्य उपासना करणार आहात ते कार्य भगवान दत्तप्रभूच्या कृपाप्रसादाने लवकरच सिद्ध झाले तरी संकल्पित उपासना चालू ठेवावी. इच्छित कार्य पूर्ण झाले म्हणून उपासना मध्येच सोडू नये. उपासनेची विधिवत सांगता करावी. त्यामुळे उपासनेचे संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होईल. दत्तगुरू कृपादृष्टीने पाहतील.

१७) दत्तप्रभूच्या कृपेने आपले इष्टकार्य संपन्न झाल्यावर लवकरात लवकर औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, कुरवपूर, गिरनार अशा कोणत्याही दत्तक्षेत्री जाऊन श्रीगुरूंचे दर्शन घ्यावे. त्यांची यथाशक्ती पूजा करावी. दानधर्म करावा.

१८) उपासनाकाळात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा “श्रीगुरुचरित्र कथासार” या श्रीगुरूंच्या गद्यरूप चरित्राचे वाचन करावे. (टीप श्री. जितेन्द्रनाथ ठाकूर यांनी धार्मिक प्रकाशन संस्था या प्रकाशकांसाठी ‘श्रीगुरुचरित्र कथासार’ हे उपयुक्त पुस्तक लिहिले आहे.)

१९) उपासनेचे अंग म्हणून अध्याय वाचन करताना-पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावे. स्वतःला बसण्यासाठी आसन म्हणून दर्भाच्या चटईवर घोंगडी घालून त्यावर राजापुरी शुभ्र पंचा अंथरावा. आसनावर बसताना व उठताना त्याला नमस्कार करावा. शुद्ध आसनावर बसूनच अध्याय वाचन करावे. अध्याय पठणाची वेळ निश्चित असावी. वाचन करताना मन शांत, निश्चित, प्रसन्न व एकाग्र असावे. घाई, गडबड न करता स्पष्ट उच्चारांसहित अर्थाकडे लक्ष देऊन संथपणे वाचन करावे. भगवान दत्तात्रेय आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत अशी भावना असावी. अध्यायवाचन करताना कोणाशीही बोलू नये. वाचन पूर्ण होईपर्यंत आसनावरून उठू नये. पोथीवाचन काळात साजूक तुपाचे निरांजन (वा समई) व सुगंधी अगरबत्ती अखंड ठेवावी. शक्यतो सोवळ्याने वाचन करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसातून तीन वेळा वाचन करावे. पण ते शक्य नसेल तर सकाळी (ब्राह्ममुहूर्तापासून सूर्योदयानंतरचा एक प्रहर) वा सायंकाळी (दिवेलागणीच्या वेळी) वाचन करावे.

२१) ज्या ज्या वेळी काही महत्त्वाच्या कार्यासाठी जायचे असेल तेव्हा श्रीगणपती व दत्तात्रेयांचे स्मरण करावे. या पुस्तिकेवर सुगंधी पुष्प वाहावे. नमस्कार करावा. दत्तप्रभूना आपल्या सोबत राहण्याची विनंती-प्रार्थना करावी. श्रीगुरूंच्या कृपेने कार्यसिद्धी झाल्याचे समाधान मिळेल.

२२) उपासकाला खूपच पीडा असेल तर त्याने उपासनेला बसल्यावर आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर पाण्याने भरलेला लहानसा पेला ठेवावा. तो उजव्या तळहाताने झाकावा. उजव्या हाताच्या अंगठ्याने पाण्याला स्पर्श करून तीन वेळा संस्कृत दत्तकवच म्हणावे. त्या अभिमंत्रित जलाने तीन वेळा आचमन करावे. मग जागेवरून उठावे. ते जल संपूर्ण घरात व घराबाहेर शिंपडावे पुन्हा आसनस्थ व्हावे. पेल्यातील थोडे पाणी उजव्या हाताने स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवावे. असे तीन वेळा करावे. याला दिग्बंधन करणे म्हणतात. त्यामुळे दुष्ट, उपद्रवी शक्ती रोखल्या जाऊन उपासनेत विघ्न येत नाहीत. मग तोच पेला स्वतःपाशी वस्त्राच्या आसनावर ठेवावा. उपासना पूर्ण झाल्यावर आसनावर बसून त्याच पेल्यातील अभिमंत्रित जल उजव्या हाताने स्वतःभोवती डावीकडून उजवीकडे फिरवावे. असे तीन वेळा करावे. यालाच दिग्विमोचन करणे म्हणतात. पेल्यातील उर्वरीत जल स्वयंपाकघरातील पाण्यात घालावे.

उपासनेचा संकल्प Gurucharitra Adhyay 14 pdf

१) कोणतीही काम्य उपासना संकल्पाशिवाय करू नये असा संकेत आहे. संकल्पाने उपासनेत दृढपणा येतो व उपास्य देवतेची प्रसन्नता लाभून तिच्या कृपेने ईप्सित कार्य लवकर सफल होते. ‘श्रीगुरुचरित्र’ या ग्रंथाच्या चौदाव्या अध्यायाच्या पठणरूपी उपासनेस प्रारंभ करताना तिचा संकल्पही प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे.

२) या दिवशी स्नानानंतर शुद्ध वस्त्रे नेसून कपाळास गंध लावावे. घरातील देवांची नित्यपूजा करावी. त्यानंतर वडीलधाऱ्यांना वंदन करून देव्हाऱ्यासमोर उभे राहावे. देवांना नमस्कार करावा. श्रीगणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थलदेवता, इष्टदेवता व श्रीगुरूदेवांचे स्मरण करावे.

३) उजव्या हातावर पळीभर पाणी घ्यावे आणि पुढीलप्रमाणे संकल्प म्हणावा- “श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः। श्रीगुरू नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांना नमस्कार असो. 

गुरुदेव ! तुम्ही भक्तवत्सल व भक्ताभिमानी आहात. कारुण्यसिंधू आहात. भाविकांचे रक्षणकर्ते, दीनआर्ताचे उद्धारकर्ते व निजदासांचे कल्याणकर्ते आहात. तुम्हाला शरण आलेल्यांची तुम्ही कधीही उपेक्षा करीत नाही म्हणूनच मी… (आपले नाव घ्यावे)… आज शके एकोणीसशे…त…. (मराठी महिन्याचे नाव घ्यावे.) … मासात,… (कृष्ण वा शुक्ल यापैकी जो पक्ष असेल त्याचे नाव घ्यावे.) … पक्षातील… या तिथीस… वारी… माझे… (येथे आपली मनोकामना सांगावी.)… हे कार्यसिद्धीस जावे म्हणून आपल्या ‘श्रीगुरुचरित्र’ या ग्रंथातील चौदाव्या अध्यायाची पठणरूपी उपासना पुढील सहा महिने नित्यनियमाने करण्याचा संकल्प करीत आहे. या उपासनेच्या नियमांचे निष्ठेने आचरण करून मी आपल्या प्रीत्यर्थ पंचोपचारे पूजन, चौदाव्या अध्यायाचे पठण व नामस्मरण करून यथाशक्ती आपली सेवा करणार आहे. उपासनेची यथाविधी सांगता करणार आहे. ही संपूर्ण उपासना आपल्या कृपेने निर्विघ्न पार पडो. तसेच या उपासनेने संतुष्ट होऊन आपण माझी मनोकामना पूर्ण करा. मला यशवंत करा. जयवंत करा. निजकृपेने माझे कल्याण करा अशी मी आपणांस नम्र विनंती करतो. श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः। मम कार्य निर्विघ्नमस्तु ।” असे म्हणून तळहातावरील संकल्पयुक्त जल ताम्हनात सोडावे. गणपती दत्तात्रेयांना एकेक फूल वाहून नमस्कार करावा.

४) ताम्हनातील जल तुळशीस वा फूलझाडांस घालावे. प्रथम दिनी असा संकल्प केल्यावरच उपासनेस प्रारंभ करावा. या पुस्तिकेत सांगितल्याप्रमाणे दत्तात्रेयांची पूजाअर्चा करावी.

श्रीदत्तात्रेय नित्योपासना

१) उपासकाने सकाळी लवकर उठावे. श्रीदत्तात्रेय, श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचे स्मरण करावे.

२) स्नान करून शुचिर्भूत व्हावे. शुद्ध वस्त्रे नेसावी. कपाळास गंध लावावे.

३) श्रीगणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, इष्ट देवता व श्रीगुरूंचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. घरातील देवांची नित्यपूजा करावी.

(टीप – ही देवपूजा अन्य कोणी करीत असल्यास त्यांनाच करू द्यावी. आपण हळद, कुंकू, अक्षता व फुले वाहून नमस्कार करावा.)

४) पूजेची पूर्वतयारी – उपासनेचे पूजास्थान स्वच्छ करून घ्यावे. जमिनीवर रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढून त्यावर चौरंग वा पाट मांडावा. त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी. चौरंगावर पिवळे वस्त्र वा अन्य शुद्ध वस्त्र घालावे. त्यावर दत्तात्रेयांची मूर्ती वा तसबीर ठेवावी. चौरंगावर आपल्या उजव्या हातास अक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनासाठी सुपारी मांडावी. चौरंगावर उदबत्ती, दोन वातींचे साजूक तुपाचे निरांजन, पानसुपारी, प्रसादाचा नैवेद्य व ही पोथी ठेवण्यासाठी पुरेशी

जागा असावी. पूजेचे साहित्य तबकात आपल्या डाव्या बाजूस ठेवावे. स्वतःला बसण्यासाठी आसन मांडावे.

५) पूजाप्रारंभ

अ) प्रथम हात जोडून पुढील ध्यानमंत्र म्हणून अनुक्रमे श्रीगणपती, श्रीगुरुदेव व श्रीदत्तात्रेयांचे स्मरण करावे.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरूः साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ।। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् । तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः ।। काषायवस्त्रं करदण्डधारिणम् । कमंडलुं पद्मकरेण शंखम् । चक्रं गदाभूषितभूषणाढ्यम् । श्रीपादराजं शरणं नमस्ते ।। ॐ नमो भगवते गजाननाय । ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय ।।

आ) मग गणपती व दत्तात्रेयांना पूजनसेवा स्वीकारण्यास येण्याची विनंती करावी.

इ) गणपतीची व दत्तात्रेयांची गंध, पुष्प (हार), धूप, दीप व नैवेद्यासह पंचोपचारे पूजा करावी. उपचार अर्पण करताना ‘श्रीदत्तात्रेय गुरवे नमः ।’ हा मंत्र म्हणून मगच उपचार अर्पण करावेत. पोथीचीही पूजा करावी. प्रथम दिनी चौरंगावर श्रीगुरूंसमोर विडा-सुपारी, श्रीफळ व दक्षिणा ठेवावी.

ई) त्यानंतर श्रीगुरुचरित्र ग्रंथातील चौदाव्या अध्यायाचे वाचन करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दत्तात्रेय अष्टोत्तरशत नामावली म्हणावी किंवा ‘ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ।’ या मंत्राचा तुळशीमाळेवर १०८ वेळा जप करावा. वाचन व जप झाल्यावर गणपती, दत्तात्रेय व या पोथीला गंधाक्षता व पुष्प वाहून नमस्कार करावा.

3) कापूर प्रदीप्त करून श्रीगणपतीची, श्रीदत्तात्रेयांची व श्रीनृसिंहसरस्वतींची आरती म्हणावी. मंत्रपुष्प अर्पण करून पुढीलप्रमाणे विनम्र प्रार्थना करावी- “गुरुदेव! मी आपली पंचोपचारे पूजा करून पवित्र नैवेद्य अर्पण केला आहे. तरी या पूजेचा, नैवेद्याचा आणि अध्यायपठणरूपी सेवेचा स्वीकार करून आपण मजवर प्रसन्न व्हा. मी अल्पमतीने केलेल्या या सेवेत काही न्यून राहिले असल्यास पुरते करून घ्या अशी प्रार्थना करतो.” मग श्रीगुरूंचा जयजयकार करून सर्वांना प्रसाद वाटावा. त्यानंतर आपल्या नित्यकर्मास लागावे

ऊ) सायंकाळी कामावरून परतल्यानंतर स्नान करून चौरंगावरील दत्तप्रभूसमोर निरांजन व सुगंधी अगरबत्ती लावून नमस्कार करावा. भोजनापूर्वी ‘यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय मामकीम् । इष्टकाम-प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च।’ हा मंत्र म्हणून गंधाक्षता वाहाव्या आणि पूजाविसर्जन करावे. पूजेचे सर्व साहित्य स्वच्छ करून योग्य जागी ठेवावे.

श्रीदत्तात्रेय उपासनेची सांगता

याप्रमाणे सहा महिने संकल्पित उपासना पूर्ण झाल्यावर त्या उपासनेची दिनशुद्धी पाहून यथाविधी सांगता करावी. सांगतादिनी श्रीदत्तात्रेयांना अष्टोत्तरशतं नामावली किंवा ‘ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ।’ हा मंत्र १०८ वेळा उच्चारून दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर पंचोपचारे पूजन, अध्यायवाचन, आरती, मंत्रजप या क्रमाने नित्योपासना झाल्यावर श्रीदत्तात्रेयांना घरातील अन्नाचा महानैवेद्य दाखवावा. त्यात मुगाची खिचडी, घेवड्याची भाजी, वडे, दही व एखादे गोड पक्वान्न असावे. एक ब्राह्मण किंवा बटू यांना भोजनासाठी निमंत्रित करावे. त्यांना यथाशक्ती द्रव्यदक्षिणा व वस्त्र द्यावे. गोग्रास द्यावा. दानधर्म करावा. सायंकाळी दत्तमंदिरात जाऊन देवदर्शन करून यावे.

।। श्रीगुरुचरित्र ।।

अध्याय चौदावा

श्रीगणेशाय नमः ।। नामधारक शिष्य देखा || विनवी सिद्धासी कौतुका ।। प्रश्न करी अतिविशेखा || एकचित्ते परियेसा ||१|| जय जयाजी योगीश्वरा ।। सिद्धमूर्ती ज्ञानसागरा ॥ पुढील कथा विस्तारा ॥ ज्ञान होय आम्हांसी ऐसी ||२|| उदरव्यथेच्या ब्राह्मणासी || प्रसन्न झाले श्रीगुरु कृपेसीं ।। पुढे कथा वर्तली कैसी || विस्तारावें आम्हांप्रती ||३|| ऐकोनी शिष्याचे वचन || संतोषे सिद्ध आपण || गुरुचरित्र कामधेनु जाण ॥ सांगता झाला विस्तारोनि ॥४॥ ऐक शिष्या शिरोमणी ॥ भिक्षा केली त्याचे भुवनी || तयावरी संतोषोनि ।। प्रसन्न झाले परियेसा ॥५॥

गुरुभक्तिचा प्रकार ॥ पूर्ण जाणे द्विजवर ।। पूजा केली विचित्र || म्हणोनि आनंदे परियेसा ॥६॥ तया सायंदेव द्विजासी ॥ श्रीगुरू बोलती संतोषी || भक्त व्हावें वंशोवंशी ॥ माझी प्रीती तुजवरी ॥७॥ ऐकोनि श्रीगुरूंचे वचन || सायंदेव नमन करून ॥ माथा चरणीं ठेवून ॥ नमिता झाला पुनः पुनः ।।८।। जय जयाजी सद्‌गुरु ।। त्रिमूर्तीचा अवतारू ।। अविद्यामायें दिससी नरु || वेदां अगोचरू तुझा महिमा ||९|| विश्वव्यापक तूंचि होसी ॥ ब्रह्मा विष्णु व्योमकेशी ॥ धरिलें स्वरूप तूं मानवासी ।। भक्तजन तारावया ॥१०॥

तव महिमा वर्णावयासी । शक्ति कैची आम्हांसी ।। मागणे एक तुम्हांसी ॥ कृपा करणे गुरुमूर्ती ॥११॥ माझे वंशपरंपरी ॥ भक्ति द्यावी निर्धारी ॥ इह सौख्य पुत्रपौत्री ॥ अंती द्यावी सद्गति ॥१२॥ ऐशी विनंती करूनी || पुनरपि विनवी करुणावचनी || सेवा करितो द्वारीं यवनी ।। महाक्रूर असे तो ॥१३॥ प्रतिसंवत्सरी ब्राह्मणांसी ॥ घात करितो जो बहुवसीं ॥ याचि कारणे आम्हांसी ॥ बोलावीतसे परियेसा ॥१४॥ जातां तयाजवळी आपण ॥ निश्वयें घेईल माझा प्राण ॥ भेटी झाली तुमची म्हणोन ॥ मरण कैचे आम्हांसी ॥१५||

संतोषोनि श्रीगुरुमूर्ती ॥ अभय देती तयाप्रती || विप्रमस्तकीं हस्त ठेविती ॥ चिंता न करी म्हणोनिया ॥१६॥ भय सांडूनि त्वां जावें ॥ क्रूर यवनातें भेटावें ॥ संतोषोनि प्रियभावें ॥ पुनरपि पाठवील आम्हांप्रती ॥१७॥ जोवरी परतोनि तूं येसी || असों आम्ही भरंवसीं ।॥ तूं आलिया संतोषी ॥ जाऊं मग येथोनिया ||१८|| निजभक्त आमुचा तूंचि होसी || परंपरी वंशोवंशी ॥ अखिलाभीष्ट तू पावसी || वाढे संतति तुझी बहुत ॥१९॥ तुझे वंशपरंपरीं ॥ सुखे नांदती पुत्रपौत्री || अखंड लक्ष्मी तुझे घरीं ॥ निरोगी शतायु नांदाल ॥२०॥

ऐसा वर लाधोन ॥ निघे सायंदेव ब्राह्मण ॥ जेथें होता तो यवन ॥ गेला त्वरित त्याजवळी ॥२१॥ कालांतक यम देखा ॥ यवन दुष्ट परियेसा ॥ ब्राह्मणातें पाहता कैसा || ज्वालारूप होता झाला ||२२|| विन्मुख होऊनि गृहांत || गेला यवन कोपत ॥ विप्र झाला भयचकित ॥ मनीं श्रीगुरु ध्यातसे ॥२३॥ कोप आलिया ओळंदयासी ॥ केवी स्पर्शे अग्नीसी ॥ श्रीगुरुकृपा असे जयासी ॥ काय करील यवन दुष्ट ॥२४॥ गरुडाचिया पिलीयासी ॥ सर्प कैसा डंसी || तैसी त्या ब्राह्मणासी ।। असे कृपा श्रीगुरूची ॥ २५॥

कां एखादे सिंहासी ॥ ऐरावत केवी ग्रासी ॥ श्रीगुरुकृपा ज्यासी ॥ कलिकाळाचें भय नाहीं ॥२६॥ ज्याचे हृदयीं गुरुस्मरण || भय कैचें तया दारूण || काळमृत्यू न बाधे जाण ॥ अपमृत्यू काय करील ॥ २७॥ ज्यासी नाहीं मृत्यूचे भय ।। त्यासी यवन करील काय ।। श्रीगुरुकृपा ज्यासी होय ।। यमाचें भय नाहीं तया ॥२८॥ ऐसियापरी तो यवन ।। गृहीं निघाला भ्रमेंकरून || दृढ निद्रा लागतां जाण ॥ शरीरस्मरण नाहीं त्यासी ॥ २९॥ हृदयज्वाळा होवोनि त्यासी ।। जागृत होवोनि परियेसीं ।। प्राणांतक व्यथेसी ॥ कष्टतसे तये वेळीं ॥३०॥

स्मरण नसे कांहीं ॥ म्हणे शस्त्र मारितो घाई || छेदन करितो अवेव पाहीं ॥ विप्र एक आपणासी ॥३१॥ स्मरण झालें तये वेळीं ॥ धावत गेला ब्राह्मणाजवळी ॥ लोळतसे चरणकमळीं ।॥ म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥ तूंतें पाचारिलें येथें कवणी ॥ जावें त्वरित परतोनि ॥ वस्त्रं भूषणें देवोनि || निरोप देत तये वेळीं ॥३३॥ संतोषोनि द्विजवर || आला ग्रामीं सत्वर ॥ गंगातीरी जाय लवकर ॥ श्रीगुरूचे दर्शनासी ॥३४॥ देखोनिया श्रीगुरूसी || नमन करी भावेंसी ॥ स्तोत्र करी बहुवसी ॥ सांगे वृत्तान्त आद्यंत ॥ ३५॥

संतोषोन श्रीगुरुमूर्ति ॥ तया द्विजा आश्वासिती ॥ दक्षिणे दिशे जाऊं म्हणती ॥ स्नान तीर्थयात्रेसी ॥३६॥ ऐकोनि श्रीगुरूचें वचन ॥ विनवीतसे कर जोडून || न विसंबे आतां तुमचे चरण || आपण येईन समागमें ॥३७॥ तुमचे चरणाविणें देखा ॥ राहूं न शके क्षण एका ॥ संसारसागरतारका ॥ तूंचि देवा कृपासिंधू ॥३८॥ उद्धराया सगरांसी ॥ गंगा आली भूमीसी ॥ तैसा स्वामी आम्हांसी || दर्शनें उद्धार आपुल्या ||३९|| भक्तवत्सल तुझी ख्याति ।। आम्हां सांडणें काय नीति || सवेंचि येऊं हें निश्चिती ॥ म्हणोनि चरणीं लागला ॥४०॥

येणेंपरी श्रीगुरूसी ॥ विनवी विप्र भावेंसी ॥ संतोषोनि विनयेंसी || श्रीगुरु म्हणती तये वेळीं ॥४१॥ कारण असे आम्हां जाणें ॥ तीर्थे असती दक्षिणे ।। पुनरपि तुम्हां दर्शन देणें ।॥ संवत्सरीं पंचदशी ।॥४२॥ आम्ही तुमचे ग्रामासमीपत || वास करूं हे निश्चित || कलत्र पुत्र इष्ट भ्रात ॥ तुम्हीं आम्हां भेटावे ॥४३॥ न करीं चिंता असां सुखे ।। सकळ अरिष्टे गेलीं दुःखे ॥ म्हणोनि हस्त ठेवी मस्तकीं ।॥ भाक देती तये वेळीं ।॥४४॥ ऐसेंपरी सांगोनि ॥ श्रीगुरु निघाले तेथोनि ॥ जेथे असे आरोग्यभवानी ॥ वैजनाथ महाक्षेत्र तें ।॥४५।।

समस्त शिष्यांसमवेत || श्रीगुरु आले तीर्थ पहात || प्रख्यात असे वैजनाथ || तेथें राहिले गुप्तरूपें ॥४६॥ नामधारक विनवी सिद्धासी || कारण • काय गुप्त व्हावयासी || होते शिष्य बहुवसी ॥ त्यांसी कोठें ठेविलें ॥४७॥ गंगाधराचा नंदन ॥ सांगे गुरुचरित्रवर्णन ॥ सिद्धमुनि विस्तारोन ॥ सांगे नामधारकासी ॥४८॥ पुढील कथेचा विस्तार ॥ सांगतसे अपरंपार || मन करुनि एकाग्र ॥ ऐका श्रोते सकळिक ॥४९॥ वास सरस्वतीचे तीरीं ॥ सायंदेव साचारी || तया गुरूतें निर्धारी ॥ वस्त्रे भूषणें दीधलीं ॥५०॥ गुरुचरित्र अमृत || सायंदेव आख्यान येथ ॥ यवनभयरक्षित ॥ थोर भाग्य तयाचें ॥५१॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने दुष्टयवनशासनं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।। ओवीसंख्या ॥५१॥

।। श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ।।

gurucharitra adhyay 14 pdf

।। श्रीगुरुचरित्र ।। अध्याय चौदावा

Gurucharitra Adhyay 14 pdf

सायंदेवाचे प्राणसंकट टळले

(मराठी सारांश)

श्रीगणेशाय नमः ।॥ श्रीदत्तात्रेय महाप्रभूनी लोकोद्धारासाठी भारतवर्षात श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती व श्रीस्वामी समर्थ असे क्रमाने तीन अवतार घेतले. श्रीगुरुचरित्र या ग्रंथात श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे.

श्रीगुरू नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र काशी येथे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध अशा कृष्णसरस्वतींकडून विधिवत् संन्यासदीक्षा घेतली आणि तीर्थयात्रेस निघाले. ते वासरब्रह्मेश्वर तीर्थास आले असताना त्यांनी उदरव्याधीने गांजलेल्या एका ब्राह्मणाला नदीमध्ये आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. तेथे सायंदेव नावाचा एक ब्राह्मण स्नानासाठी आला होता. तो ग्रामाधिकारी म्हणून काम पाहत असे. त्याच्यासमोर मोठेच भयसंकट उभे होते. श्रीगुरूंची सोज्ज्वळ मूर्ती व तपश्चर्येच्या तेजाने झळकणारी मुद्रा पाहून त्याला हायसे वाटले. चित्त प्रसन्न झाले. त्याने श्रीगुरूंना वंदन केले व आपल्या घरी भिक्षेस येण्याचे निमंत्रण दिले. त्याप्रमाणे श्रीगुरु त्याच्याघरी गेले असता सायंदेवाने व त्याची पत्नी जाखाईने श्रीगुरूंची यथासांग पूजा केली. श्रीगुरूंना, त्यांच्या शिष्यांना व त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणास सुग्रास भोजन दिले. श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने त्या भोजनानंतर ब्राह्मणाची उदरव्याधी कायमची गेली. (पूर्ववृत्त संपूर्ण)  

सायंदेवाचा भक्तिभाव पाहून श्रीगुरू प्रसन्न झाले. त्यांनी त्याला ‘तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील’ असा आशिर्वाद दिला.’ सायंदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाला, “गुरुदेव, आपला महिमा अगाध आहे. तुमच्या आशिर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो. माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो. त्यांना सद्गती प्राप्त होवो. पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे. मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो. आज त्याने मलाच मारावयाचे ठरविले आहे. मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्रित आहे. मग आपले वचन खरे कसे होणार?”

ते ऐकून श्रीगुरूंना सायंदेवाच्या धैर्याचे मोठे कौतुक वाटले. समोर एवढे भीषण संकट असूनही त्याने आत्मियतेने सेवा केली म्हणून ते अधिकच प्रसन्न झाले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून ते म्हणाले, “सायंदेवा, तू अगदी निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा. तो तुला सन्मानाने परत पाठवील. तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू माझा भक्त आहेस. तुला पुत्रपौत्रादिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे.”

श्रीगुरूंनी अभय दिले आणि सायंदेवाची काळजीच मिटली. तो यवनाकडे गेला. त्या यवनाच्या रूपाने आपल्या समोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले. यवनाने सायंदेवाला पाहिले तो काय ! तो त्याला अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसला. हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना. त्याची मती कुंठीत झाली. तोंडातून शब्द निघेना. तो संतापाने अक्षरशः थरथरत होता. त्याचे उग्र रूप पाहून सायंदेव भीतीने श्रीगुरूंचा धावा करू लागला. त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली. तो कसाबसा घरात गेला. पलंगावर पडताच झोपी गेला. तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले. त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसले. तो दचकून जागा झाला. त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या. तो घाबरला. या ब्राह्मणाचा घात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने धावत जाऊन सायंदेवाचे पाय धरले. “तुम्हाला येथे कोणी बोलावले? कृपा करून आपल्या घरी जा.” असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला.

प्राणसंकट टळले होते ! श्रीगुरूंचे सामर्थ्य किती अगाध आहे याची सायंदेवाला प्रत्यक्ष प्रचिती आली होती. ‘श्रीगुरू हेच उद्धारकर्ते आहेत, आता त्यांचीच सेवा करायची’ असा दृढनिश्चय करून तो श्रीगुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतीरी गेला. कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले. यवनाकडील वृत्तांत सांगताना त्याचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. तो म्हणाला, “गुरुदेव, आपण माझे रक्षणकर्ते आहात. आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले. आता तुमची सेवा हाच माझा धर्म. मला तुमच्या बरोबर न्या.” तेव्हा श्रीगुरू म्हणाले, “सायंदेवा, आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत. पंधरा वर्षांनी परतून येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू. त्यावेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला ये. आता तू घरीच राहा. सुखाने संसार कर.”

श्रीगुरूंनी सायंदेवाचे सांत्वन करून त्याला घरी पाठविले. गुरुकृपेने त्याचे संपूर्ण कल्याण झाले. कालांतराने तो सपरिवार गाणगापुरास जाऊन राहिला. श्रीगुरूंचे शिष्यत्व पत्करून त्यांची अहोरात्र सेवा करू लागला.

Gurucharitra Adhyay 14 pdf गुरूचरित्र अध्याय १४: भगवान दत्तात्रेयांचे महान चमत्कार आणि भक्तांच्या संकटांचे निवारण


परिचय

गुरूचरित्र हा एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेय ग्रंथ आहे, ज्यात भगवान दत्तात्रेयांच्या अद्भुत लीलांचे वर्णन केले आहे. या ग्रंथाचे वाचन आणि मनन केल्याने अनेकांना आध्यात्मिक शांती आणि समाधान प्राप्त होते. आज आपण या ग्रंथाच्या अध्याय १४ मधील काही अनोख्या घटनांचा आढावा घेणार आहोत.


मुख्य आशय

अध्याय १४ मध्ये भगवान दत्तात्रेयांनी त्यांच्या भक्तांचे संकट दूर करण्यासाठी केलेले अद्भुत चमत्कार वर्णन केले आहेत. या कथांमधून आपल्याला भक्तीचे महत्त्व आणि देवाची कृपा किती प्रभावी असते हे कळते.


दत्तात्रेयांच्या लीलांचे वर्णन

भक्तांच्या कथा
  1. भक्ताचे संकट आणि दत्तात्रेयांची कृपा: एका भक्ताला त्याच्या कुटुंबातील आर्थिक संकटांमुळे खूपच त्रास होत होता. त्याने पूर्ण विश्वासाने भगवान दत्तात्रेयांची उपासना केली. त्यांच्या कृपेने त्याच्या आर्थिक समस्या संपुष्टात आल्या आणि त्याचे जीवन सुखकर झाले.
  2. भक्तीची परीक्षा: दुसरा भक्त आपल्या धार्मिक आस्थेसाठी ओळखला जात होता. त्याच्या निष्ठेची परीक्षा घेण्यासाठी त्याला काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. परंतु, दत्तात्रेयांच्या कृपेने त्याने सर्व परीक्षांमध्ये यश प्राप्त केले आणि त्याचे जीवन आध्यात्मिक दृष्टिकोनातून समृद्ध झाले.

धार्मिक संदेश

या कथांमधून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो की, भक्ती आणि विश्वासाच्या बळावर कोणतेही संकट पार करता येते. देवाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात.


आध्यात्मिक विचार

भक्तीचा महिमा

भगवान दत्तात्रेयांच्या लीलांमधून आपल्याला भक्तीचे महत्त्व समजते. भक्तीमुळे जीवनात सकारात्मकता येते आणि आपण संकटांशी लढण्यास समर्थ होतो.

आध्यात्मिक आचरण

भक्तांच्या आचरणातून शिकण्यासारखे धडे आपल्याला मिळतात. त्यांची श्रद्धा, संयम आणि विश्वास हे गुण आपणही आत्मसात करावे.


उपसंहार

अध्यायाचे सार

अध्याय १४ मधून आपल्याला देवाच्या कृपेचा अनुभव आणि भक्तीचे महत्त्व समजते. या कथांनी आपल्याला शिकवले आहे की, देवावर विश्वास ठेवला तर जीवनातील सर्व अडचणी दूर होतात.

आध्यात्मिक प्रेरणा

भक्तांच्या कथा आणि दत्तात्रेयांच्या लीलांमधून आपल्याला प्रेरणा मिळते की, आपणही आपल्या जीवनातील संकटांवर मात करू शकतो.

गुरूचरित्राचे पालन

गुरूचरित्राचे नियमित वाचन केल्याने जीवनात सकारात्मक बदल येतात. त्यामुळे या ग्रंथाचे वाचन आणि मनन करण्याचे महत्त्व अधोरेखित करावे.


वाचकांसाठी संदेश

वाचन आणि आचरण

गुरूचरित्र वाचून त्यातील तत्त्वांचे आपल्या जीवनात आचरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवनातील अडचणींवर मात करू शकतो.

विचार करण्यासारखे मुद्दे

वाचकांनी विचार करावा असे काही प्रश्न:


नोट्स:


ब्लॉगच्या शेवटी

आपण गुरूचरित्राच्या अध्याय १४ मधून अनेक महत्त्वाचे धडे घेऊ शकतो. या पवित्र ग्रंथाचे वाचन करून आपले जीवन समृद्ध आणि सुखी करूया. आपल्या विचार आणि अनुभव शेअर करा आणि पुढील अध्याय वाचण्यासाठी सज्ज व्हा!

Exit mobile version