Site icon swamisamarthsevekari.com

Gurucharitra Adhyay 18 /श्रीगुरुचरित्र १८वा अध्याय

Spread the love
Gurucharitra Adhyay 18 /श्रीगुरुचरित्र १८वा अध्याय

|| श्रीगुरुः शरणम् ॥

सर्व वैभवांचा अमृतकुंभ देणारा

श्रीगुरुचरित्राचा १८वा अध्याय | Gurucharitra adhyay 18

‘अखंड लक्ष्मी तुमचें वंशीं। पुत्रपौर्वी नांदाल ।।’

असा प. प. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचा मंगलमय आशीर्वाद लाभलेला हा, श्रीसरस्वतीगंगाधर कृत, श्रीगुरुचरित्रांतील १८ वा अध्याय.

श्रीगुरुचरित्र हा पुरातन मंत्रमय ग्रंथ शेकडों वर्षे महाराष्ट्रांत व इतरत्र उपासनेंत आहे. श्रीदत्तउपासनेंत

त्याला एक आगळं वेगळं मानाचं स्थान आहें.

 ‘सर्व उपचार, संकल्प करून (ती माहिती स्वतंत्रपणे दिली आहे.) हा १८वा अध्याय, किमान एक वेळ

सकोळ, संध्याकाळ श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणानें, किमान १ वर्ष वाचावा. (कांहीं उपासकांच्या बाबतींत उपासनाकाल वाढवावाहि लागेल. उपासना करताना त्याची जाण येते.) 

 जमीन जुमल्याचे प्रदीर्घ काळ चाललेले तंटे, व्यक्तिगत वा व्यावसायिक कर्जबाजारी अवस्था, 

 द्रव्यचिंता, साधना-उपासनेतील अडथळे, शिक्षणातील अपयश, प्रदीर्घकाळ असलेला आजार आदि प्रश्न मार्गस्थ होऊन, सुकर होण्यास खूपच मदत होते; योग्य तें मार्गदर्शन लाभतें असा अनेकांचा अनुभव आहे.

उपचार : लाकडी पाटावर न बसता, छोटी दर्भाची (प्लॅस्टिकची नव्हे) चटई घेऊन, त्यावर कांबळा वा रंग घालावा. त्याच्यावर, नित्य धुतलेला, पांढरा पंचा अंथरून मऊ आसन तयार करावें, पंचाच्या वा रि कांबळ्याच्या दशा साधकाच्या डाव्या उजव्या हातास याव्यात, मागें किंवा पुढें येवू नयेत. आसनावर च त्र बसताना व उठताना आसनास नमस्कार करावा. साधकाचें तोंड, आसनस्थ झाल्यावर, पूर्व वा उत्तर दिशेला वा असावें. साधकानें आपल्या डाव्या हातास म्हणजेच देवांच्या उजव्या हाताला मंद सुवासाच्या  ध्या उदबत्त्या, तुपाचें २ वातींचें निरांजन लावावें. (जें तूप आपल्याकडे असेल तें वापरावें. तुपाचा दिवा वाचन य संपेपर्यंत तेवत ठेवावा. तुपाच्या दिव्यानें उपासना लवकर फलद्रुप होण्यास खूपच मदत होते.) श्रीकुलदेव- देवता, श्रीगुरुपरंपरा, उपास्य दैवत यांना दूधसाखरेचा नैवद्य अर्पण करावा. कुलपरंपरा, माता-पिता, गृहलक्ष्मी यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करावें. (महिला उपासकांनीं ‘गृहलक्ष्मी’ ऐवजी ‘गृहसंवर्धक-संरक्षकाचें’  स्मरण करावें). साधकाच्या उजव्या हातास रुमालाची चौपदरी घडी वा त्या आकाराचें एक छोटें आसन श्रीदत्तप्रभूसाठीं मांडावें. (त्याचें तोंड दक्षिणेकडे नसावें.) प्रार्थना करावी. ‘प्रभु, आपलं गुणगान करतों आहे. मला, सुसह्य होईल असें, दर्शन देण्यासाठीं अवश्य या. आपलें स्वागत आहें. या, बरं.” आसनावर गंधफूल  अर्पण करावं. अष्टगंध वहावं. अत्तर लावावं. उदबत्ती, निरांजनानें आसनाला (श्रीदत्तप्रभू स्थानापन्न झाले  आहेत अशी मनोमन भावना करून) ओवाळून, डोकं टेकून नमस्कार करावा. संकल्प करून वाचनास  सुरुवात करावी. 

बाचन थोडें मोठ्यानें (आपलें आपल्याला ऐकू येईल इतपत) करावें, त्यामुळे वाचाशुद्धि, श्री तनुशुद्धि, वातावरणशुद्धि होईल. उपासना संपन्न झाल्यावर श्रीदत्तप्रभुंच्या आसनासमोर दूध-साखरेचा नैवद्य गु अर्पण करावा. 

नैवेद्य अर्पण करताना त्यासोबत नेहमीं पिण्याचें पाणीहि भांड्यांतून ठेवावें. ५/१० मिनिटांनंतर आसन, पोथी उचलून ठेवावी. नैवेद्याचें दूध सर्वांनीं घ्यावें अगर चहा-कॉफींत वापरावें, मात्र तें

तुळशीला वा अन्य झाडांना घालू नये. भांड्यातील पाणी आपल्या पिण्याच्या पाण्यांत घालावें.

संकल्प : संकल्प करूनच उपासनेला सुरुवात करावी. आपल्या अडचणीचा, समस्येचा सर्वप्रथम उच्चार

ध्या करावा. त्या निवारणार्थ प्रभूला प्रार्थना करावी आणि म्हणावें, ‘आम्हां सर्वांना सर्वार्थानं समर्थ, संमृद्ध, निर्विघ्न, मंगलमय, आनंदमय, सात्त्विक करून निरंतर श्रीचरणसेवारत करा. आमच्यावर अखंड कृपा करा  आणि आपल्या कृपेला पात्र होणारे आचरण आमच्याकडून सदैव करवून घ्या. यशवंत करा, जयवंत करा.’

सर्वच परिस्थिती प्रतिकूल आहे; पद्धतशीर उपासना करता येत नाही आणि उपासना करण्याची तर मनस्वी इच्छा आहे, तर मग….

अंतःकरण असतां पवित्र । सदाकाळ वाचावें गुरुचरित्र ।

सौख्य होय इहपरत्र। दुसरा प्रकार सांगेन ॥ ८५॥

सप्ताह वाचावयाची पद्धती। तुज सांगो यथास्थिति । 

शुचिर्भूत होवोनि शास्त्ररीतीं। सप्ताह करितां बहु पुण्य ॥ ८६ ॥ 

(गुरुचरित्र अवतरणिका)

सामान्यपणे शुचिर्भूत होऊन, जशी जमेल तशी, १८ व्या अध्यायाची सेवा करावी. अशा सेवेतूनहि र पुढील मार्ग दिसेल. थोडा वेळ लागेल. कुठं बिघडलं ? बोबड्या बोलांनीं आईला हांक मारली तर ती ‘ओ’ १८देत नाही कां ? चला, उपासनेला सुरुवात करूं या.

अतिशय महत्त्वाचें : ज्या उपासकांना बरीच पीडा असेल त्यांनी आसनस्थ झाल्यावर, आपल्या डाव्या 卐 ध्या हाताच्या तळव्यावर पाण्यानें भरलेलें भांडें (पेला) ठेवावें. त्यावर उजव्या हाताचा तळवा झांकणासारखा  य ठेवून उजव्या हाताचा अंगठा पाण्यांत बुडवून मग श्रीदत्तकवच (संस्कृत), श्रीदेवीकवच (संस्कृत/मराठी), * श्रीशिवकवच (संस्कृत/मराठी), श्रीरामरक्षा (संस्कृत), श्रीहनुमानकवच (संस्कृत), श्रीहनुमान चालीसा (हिन्दी) ह्यापैकी कोणतेहि एक कवच वा स्तोत्र किमान ३ वेळा म्हणावें, नंतर तें भांड्यांतील अभिमंत्रित पाणी स्वतः तीन वेळा आचमनासारखे पोटांत घ्यावें; घरभर, घराबाहेर शिंपडावें. घरांत सर्वत्र व घराबाहेर  शिंपडण्यासाठीं पाणी कमी पडत असेल तर, अभिमंत्रित सर्व पाणी, मोठ्या पाण्यानें भरलेल्या लोटींत वा

पातेल्यांत ओतावें. पातेलें वा लोटी नुसती जमीनीवर ठेवलेली नसावी. त्याखालीं आसन आवश्यक आहें.

** वेळेचा अभाव असल्यास श्रीदुर्गासप्तशतीच्या चवथ्या अध्यायातील २४, २५, २६ व २७ वा, हे चार लोक ३ वेळा म्हणून दिगबंधन करावें. सुरुवात ‘शूलेन पाहि नो देवि पाहि खड्गेन चाम्बिके।…’ उपासना संपन्न झाल्यावर दिग्विमोचनहि करावें.

अभिमंत्रित पाणी मिसळल्यावर लोटी वा पांतल्यांतील पाणी सर्वत्र शिंपडावे. जरुर तर स्वयंपाकाच्या पाण्यांतहि घालावें. पुन्हा आसनस्थ होऊन वरील पाणी उजव्या हातानें, आपल्या भोंवती, उजवीकडून डावीकडे गोलाकार तीन वेळा फिरवून दिग्रबंधन (दिशांचे बंधन तेथून येणाऱ्या सर्व त-हेच्या अनिष्ट, उपद्रवी शक्तींना तात्पुरतें रोखणें.) करावें. भांड्यात थोडें पाणी शिल्लक ठेवावें. भांडे जमीनीवर ठेवू नये. रत्याखालीं आसन असावें, उपासना संपन्न झाल्यावर आसनावरून उठण्यापूर्वी, भांड्यातील अभिमंत्रित पाणी, उजव्या हातानें, आपल्या भोंवती, डावीकडून उजवीकडे तीन वेळा गोलाकार फिरवून दिग्विमोचन (दिशा वा बंधमुक्त करणे.) करावें.

 हें सर्व केल्यामुळे उपासकांची उपासना व्यवस्थित, अडथळे, आजार, अडचणी, संकटे न येतां निर्विघ्नपणें पार पडतें असा अनुभव आहे. तें आवश्यकहि आहें. 

कांहीं पथ्यें : जमीन जुमल्याच्या तंट्यांत, पूर्वी दिलेलें कर्ज संबंधितांकडून परत येत नसल्यास, नोकरींत,

व्यावसायिक स्पर्धेत प्रतिस्पर्धी त्रासदायक वर्तन करीत असल्यास, त्यापैकी कुणाचाहि कृपया द्वेष करूं नका. तिरस्कार करूं नका. त्यांच्याबाबत मन दुखावेल असें वक्तव्य इतरत्र करूं नका. थोडी उदारदृष्टि ठेवा आणि सतत म्हणत जा. ‘कांहीं तरी कारणांमुळे ही मंडळी आज विचित्र वागत असली तरी ती खरी सज्जन आहेत. प्रेमळ आहेत. दयाघन भगवंत, त्यांना सर्वांगीण बरकत देवो. त्यांच्या गरजा पूर्ण होऊन इतरांचें कर्ज फेडण्याची, भांडणांत सलोखा करण्याची, नोकरी-व्यबसायांत निकोप, निर्वैर वागण्याची बुद्धि त्यांना देवो.  

सारे क्लेश नाहीसे होऊन अखेर सर्वांना आनंद, समाधान लाभो.’ ह्यानें काय होईल ? तुम्ही मनानें स्वच्छ राहाल. स्वच्छ वागाल. स्वतःचा जळफळाट करून घेऊन तुमच्या मनाचा तोल जाणार नाही. वृत्ति आनंदी, श्री शांत राहीलः उपासना लवकर फलद्रुप होण्यास साहाय्य होईल. द्रव्यचिंता, शिक्षणातील अपयश, जुनाट आंजार ह्यामुळे खचू नका. ‘हेहि दिवस जातील’ असं वाक्य तुमच्या राहात्या घरांत खडूनें लिहून ठेवा. जातां येतां तें वाचा. संपन्नतेच्या काळांत, “उतू नका. मातूं त्र नका. सावध रहा.” असं हें वाक्य बजावील. अडचणीच्या काळांत, दीर्घ आजारांत “अरे चिंता नको. प्रश्न सुटतात. नवीन औषधं लाभदायक आहेत. प्रभू मदत करील. थोडा धीर धरूं या.” असा दिलासा “हेहि दिवस जातील” हें वाक्य तुम्हांला जरूर देईल. थोडक्यांत उदास, निराश न होता उपासना करा.

साधना-उपासनेंत अडथळे येतात, त्यावेळीं साधक थोडाफार विचलित होतो. नाउमेद होतो. अभ्यास करणारांला अडचणी येतात. प्रवास करणाराला छोट्या वा बिकट प्रसंगांना तोंड द्यावें लागतें. खेळणाराला खरचटतें वा मार लागतों. कांहींच न करणारा सुरक्षित, स्वस्थ राहातों; पण तो जागेवरच राहातों. प्रगति, पराक्रमाची अपेक्षा असणारांनीं… शांत राहून आगेकूच करायची असते. खरं ना? शांतवृत्ति, सहनशीलता, आनंदी वातावण, उपासनेंत एकाग्रता प्राप्त करून देईल. त्यायोगें उपासनेतील यश दृष्टिपथांत येतें.

‘थोर ती गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटें ॥’

‘मी कांहीं तुमच्याकडे भीक मागायला आलों नाहीं. माझें हक्काचे पैसे मागतों आहें, देशपांडे साहेब

‘पैसे आले कीं देईन.’

‘कधीं ?’

‘मिळतील तेव्हां !’

‘तोपर्यंत मी काय टाळ्या वाजवीत बसूं ?’

‘त्याला काय इलाज आहे? मी मुद्दाम तुम्हांला रखडवीत नाही, साहेब.’

‘अहो, ९० हजार ही तुमच्या दृष्टीनें छोटी, पण माझ्या दृष्टीनें फार मोठी रक्कम आहे. माझ्या धंद्याचा गळा 

आवळला जाईल, तुम्ही रक्कम दिली नाहीत तर.’

‘मी प्रयत्न करतों. हातीं येतांच, तुमची रक्कम…’

‘अहो, देशपांडे हैं मी गेले ८/९ महिने ऐकतों आहें. आतां तुम्हाला कोर्टातच खेंचतों.’ टेबलावर हात आपटीत जाधव म्हणाले आणि देशपांड्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडले.

मध्यंतरी काहीं काळ गेला. रस्त्यांत जाधवसाहेबांना त्यांचा जुना ज्योतिषी मित्र मकरंद भोंदे भेटला. सारी हकिकत ऐकल्यावर त्यानें जाधवांना सबूरीचा सल्ला दिला. स्वच्छ मनानें, देशपांड्यांना सदिच्छा देवून, संकल्पादि सर्व गोष्टी करून, 

१८ व्या अध्यायाची उपासना करावयास सांगितली. ७/८ महिन्यांचा काळ गेला. एके दिवशीं सायंकाळीं जाधव पेढ्यांचा बॉक्स घेऊन मकरंदकडे गेले एकरकमीं ९० हजार रुपये आणून दिले. मी तुम्हांला काय देवू?’ ‘मला ?’ 

‘होय, तुम्हांला. तुमच्यामुळे तर…

‘माझ्यामुळे कांहीहि झालें नाहीं. हे माझ्या गुरुपरंपरेचं यश आहे. श्रीस्वामींना पेढ्यांचा नैवद्य अर्पण करा 

आणि प्रसाद म्हणून मला एक पेढा द्या’.

प्रसाद घेतल्यावर मकरंद म्हणाला, ‘देशपांड्यांनी एकरकमी रक्कम देताना कांहीं सूट मागितली असती 卐

तर…

‘दिली असती. आनंदानें दिली असती.’

‘मग, “ती” रक्कम तुम्ही अनदानासाठी खर्च करावी, असं मला वाटतं.’ मकरंदनें सूचना केली.

‘फारच चांगली सूचना आहे.

थोड्याच दिवसांत श्री. जाधव यांनीं, एका महिलाश्रमाला अन्नदानासाठीं रोख रक्कम दिली, तेव्हां तेथील  वृद्ध महिलेच्या हाती रक्कम सुपूर्त करताना श्री. जाधव यांचे डोळे भरून आले।

‘चित्तीं वैसलें चिंतन। नारायण नारायण ।।’

अनेकांची ओषधं घेऊन कंटाळलेले, दम्यानें हैराण होणारे बाबाजी बसंतावर चिडले होते.

‘अरे, तूं काय माझी चेष्टा करायला डॉक्टरकडे घेऊन गेलास ?’

 ‘बाबाजी, मी तसं कसं करेन ?’ 

‘मग, तुझा डॉक्टर देसाई मला पहिल्या भेटीतच असं कसं म्हणाला…’

‘काय ?’

‘दमा, मधुमेह आणि संधिवात पूर्णपणे बरे होत नाहीत. ते काबूत ठेवण्याचा प्रयत्न करायचा.’

‘मग, काय खोटं आहे त्यांत? बरं, तें जाऊ दे. माणूस कसा वाटला ?’

‘एकदम झकास.’

‘त्यांनीं तुम्हांला औषधं दिली. पथ्य सांगितलं. कांहीं योगीक प्रक्रिया सूचवल्या.’

‘सारं, सारं करणार.’

‘दाणे खायचे सोडणार? पेरु, काकडी, केळी…’

‘सारं सारं सोडणार, पण मित्रा, दाण्यांची आठवण येत राहाणार.’

‘मग तुमच्या ऐवजी मी खात जाईन; तुमच्या खर्चानं!’

दोघेहि हंसू लागले. हंसता हंसता बाबाजींना दम्याची उबळ आली. ते कासावीस झाले. वसंतानें त्यांच्या पाठीवर हात फिरवीत त्यांना प्यायला थोडं पाणी दिलं.

बाबाजींनीं न चुकता पथ्य पाळलं, औषधं घेतली. १८ व्या अध्यायाची उपासनाहि केली. वर्ष-दीड  वर्षाचा काळ निघून केला. आतां ते चर्निरोड रेल्वे स्टेशनवरचा पूल न थांबता, न दमता चढतात.

उत्साहानें सर्व कामं करतात. त्यांनीं सत्तरी ओलांडली आहे, हें कुणाला खरंहि, बाटत नाहीं. गंमतीनें वसंता म्हणाला, ‘तुमच्या ह्या यशांच खरं रहस्य काय?’ ‘उपासना! चटकन् बाबाजी म्हणाले. मी बरेच डॉक्टर बदलले.

औषधं घेतली. पथ्य पाळली. म्हणण्यासारखं यश कुठेंच येत नव्हतं. तें बरचसं आलं डॉ. देसाई यांना. तेथपर्यंत पोहोंचलों, न थकता, न कंटाळता, उपासनेनें !

‘लाभतां कृपासद्‌गुरुंची। आश्रमीं येई सुख, शांति ॥’

‘तूं बारावीची परिक्षा पास होऊं शक्रला नाहीस, ह्या दुःखापेक्षा, तुझा पेपर काल होता आणि आज तूं परिक्षा केन्द्रावर गेलास, ही तुझी बेजबाबदारवृत्ति अधिक क्लेशदायी आहे. काय म्हणायचंय तुला?’ आबा गोखले संतापून त्यांच्या मुलाला नंदूला विचारत होते . तो खालीं मान घालून उभा होता. ‘माझं शिक्षणांत आतां लक्ष नाही रे, अनंता. आबांना त्रास व्हावा असं मला मुळींच वाटत नाहीं. पण ध्या य काय करावं हेहि मला सुचत नाहीं. इंग्रजी टाईपिंगच्या ६० च्या स्पीडमध्ये मी महाराष्ट्रांत पहिला आलों आहे, हें तुला माहित आहें?’

‘नाहीं. पण ही अतिशय चांगली गोष्ट आहे. नंदू, मिळेल ती नोकरी तूं स्वीकार आणि पुढें, पुढे जात रहा. अनंतानें सल्ला दिला.

‘चित्त शांत राहाण्यासाठीं, हिंमत वाढण्यासाठीं मी काय करूं?’

‘श्रीगुरुचरित्राचा १८ वा अध्याय नियमितपणे बाचत जा. बघ तरी तुला काय अनुभव येतो तो.’

नंदूनें नोकरीसाठीं प्रयत्न सुरु केले. १८ वा अध्याय वाचताना, त्यानें संकल्प करताना एक गोष्ट खास मागितली. ‘माझ्या आहे त्या बुद्धीचा जेथें उपयोग होईल असें आवडीचें क्षेत्र मला या. भाग्यबशांत एका

छोट्या औषधी कंपनींत तो क्लार्क-कम-टाईपिस्ट म्हणून नोकरीला लागला. एके दिवशीं त्याच्या साहेबांनी त्याला केबीनमध्ये बोलावून विचारलें. 

‘आनंद गोखले, बसा. तुम्हाला एक नवं काम दिलं तर कराल कां ?’

‘हो. आनंदानं.’

‘अहो, ऐकल्याशिवाय अगोदरच ‘हो’ म्हणालात?’

‘साहेब, आपण मला चांगलं कामच करायला सांगाल ह्याची मला खात्री आहे.’

‘ठीक आहे. उद्यांपासून परचेस डिपार्टमेंटमध्ये मला मदतनीस म्हणून कामाला सुरुवात करा.’

‘आनंदानें खूप कष्ट करून तें काम आत्मसात केलं. सप्लायर्सशी मैत्रीचे संबंध निर्माण केले. त्याला 

छोटीशी पगारवाढहि देण्यांत आली. त्याचा प्रवास दमदारपणे चालूच राहिला. आज सुमारे ७ वर्षांनंतर तो त्याच कंपनींत ‘असिस्टंट परचेस मैनेजर’ ह्या पदावर काम करतों आहें. 

‘काय नंदू, कसा आहेस?’ असं त्याचे मित्र त्याला विचारतात. तेव्हां तो विनम्रपणे म्हणतो, ‘दत्तप्रभुंची कृपा आहे.’ त्याचे हात नकळत जोडले जातात. तो नतमस्तक होतो. 

चंदन तो चंदनपणें। सहजगुणें संपन्न ॥ १॥ 

वैधलिया धन्य जाती। भाग्यें होती सन्मुख ॥ २ ॥

परिसा अंर्गी परिसपण। बाणोनि तें राहिलें ॥ ३॥

तुका म्हणे कैची खंती। सुजाती ते ठाकणी ॥४॥

उपासना ही चंदनासारखी आहे. चंदन हें कोणत्याहि अवस्थेंत मंद, मधुर सुवासच देईल, हे काय नव्यानें  सांगायला पाहिजे ?

उपासकांनीं, श्रीगुरुचरित्रांतील ह्या १८ व्या अध्यायाची उपासना करून आपलें लौकिक आणि पारमार्थिक जीवन संपन्न करावें, ही प्रार्थना. ह्या प्रकाशन कार्यासाठीं ज्यांनीं ज्यांनीं साहाय्य केलें, 

त्या सर्वांना दयाघन वा भगवंताची कृपा लाभो, अशी प्रार्थना करून अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतों. श्रीसद्‌गुरुचरणीं ही सेवा समर्पित अ आा करून ‘श्री’ चरणांवर माथा ठेवतों

Gurucharitra Adhyay 18 /श्रीगुरुचरित्र १८वा अध्याय

।। श्रीगुरुः शरणम् ।।

श्रीगुरुचरित्र १८ वा अध्याय | gurucharitra adhyay 18

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । जय जया सिद्धमुनि। तूं तारक भवार्णी। सुधारस आमुचे श्रवणीं। पूर्ण केला दातारा ॥ १ ॥ गुरुचरित्र कामधेनु । ऐकतां न-धाये माझें मन। कांक्षीत होतें अंतःकरण । कथामृत  ऐकावया ॥ २॥ ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं। तृप्ति नव्हे अंतःकरणीं। कथामृत संजीवनी । आणिक निरोपावें दातारा ॥ ३॥ येणेंपरी सिध्दासी। विनवी शिष्य भक्तीसीं। माथा लावूनि चरणांसी। कृपा भाकी तये वेळीं ॥४॥ शिष्य वचन ऐकोनि । संतोषला सिद्धमुनि । सांगतसे विस्तारोनि। ‘ऐका श्रोते एकचित्तें ॥५॥

ऐक शिष्या-शिखामणी’। धन्य धन्य तुझी वाणी। तुझी भक्ति 卐 श्रीगुरुचरणीं । तल्लीन झाली परियेसा ॥ ६॥ तुजकरितां आम्हांसी। चेतन जाहलें परियेसीं। गुरुचरित्र आद्यंतेसी। स्मरण जाहलें अवधारीं ॥ ७॥ भिल्लवडी स्थान महिमा ॥ निरोपिला अनुपमा। पुढील चरित्र उत्तमा । सांगेन ऐका एकचित्तें ॥८॥ क्वचित्काळ तये स्थानीं। श्रीगुरु होते गौप्येनि’। प्रकट जहाले म्हणोनि । पुढे निघाले परियेसा ॥९॥ वरुणा संगम असे ख्यात । दक्षिणवाराणसी म्हणत । श्रीगुरु आले अवलोकित । भक्तानुग्रह करावया ॥१०॥

पुढें कृष्णातटाकांत । श्रीगुरु तीर्थं पावन करीत। पंचगंगासंगम ख्यात । तेथें राहिले द्वादशाब्दें ॥११॥ अनुपम्य तीर्थ मनोहर। जैसें अविमुक्त काशीपुर। प्रयागासमान तीर्थथोर । म्हणोनि राहिले परियेसा ॥ १२॥ कुरवपूर ग्राम गहन । कुरुक्षेत्र तेंचि जाण। पंचगंगासंगम कृष्णा। अत्योत्तम परियेसा ॥१३॥ कुरुक्षेत्रीं जितकें पुण्य ॥ तयाहूनि अधिक असे जाण। तीर्थं असतीं अगण्य। म्हणोनि राहिले श्रीगुरु ॥ १४॥ पंचगंगानदीतीर। प्रख्यात असे पुराणांतर। पांच नामें आहेति थोर। सांगेन ऐका एकचित्तें ॥ १५॥

शिवा-भद्रा भोगावती । कुंभीनदी- सरस्वती। ‘पंचगंगा’ ऐसी ख्याती । महापातक संहारी ॥ १६॥ ऐसी प्रख्यात पंचगंगा। आली कृष्णेचिया संगा। प्रयागाहूनि असे चांगा। संगमस्थान मनोहर॥ १७॥ अमरापुर म्हणिजे ग्राम। स्थान असे अनुपम्य। जैसा प्रयागसंगम। तैसें स्थान मनोहर ॥ १८ ॥ वृक्ष असे औदुंबरु । प्रत्यक्ष जाणा कल्पतरु। देव असे अमरेश्वरु । तया संगमा षट्‌कूळीं ॥ १९॥ जैसी वाराणसी पुरी। गंगाभागीरथीं- तीरीं। पंचनदीसंगम थोरी। तत्समान परियेसा ॥ २० ॥

अमरेश्वरसंनिधानीं । आहेति चौसष्ट योगिनी । ‘शक्तितीर्थ’ निर्गुणी। प्रख्यात असे परियेसा ॥ २१॥ अमरेश्वरलिंग बरवें। त्यासी वंदूनि स्वभावें। पूजितां नर अमर होय। विश्वनाथ तोचि जाणा ॥ २२ ॥ प्रयागीं करितां माघस्नान। जें पुण्य होय साधन । शतगुण होय तयाहून। एक स्नानें परियेसा ॥ २३॥ सहजनदीसंगमांत । प्रयागसमान असे ख्यात । अमरेश्वर परब्रह्म वस्तु। तया स्थानीं वास असे ॥ २४॥ याकारणें तिये स्थानीं। कोटितीर्थं असतीं निर्गुणी। वाहे गंगा’ दक्षिणी। वेणीसहित निरंतर ॥ २५॥

अमित तीर्थे तया स्थानीं। सांगता विस्तार पुराणीं। अष्टतीर्थ ख्याति जाण। तया कृष्णातटाकांत ॥ २६॥ उत्तर दिशीं असे देखा। वाहे कृष्णा श्री पश्चिममुखा। ‘शुक्लतीर्थ’ नाम ऐका । ब्रह्महत्यापाप दूर ॥ २७॥ औदुंबर सन्मुखेसी। तीनी तीर्थे परियेसीं। एकानंतर एक धनुषीं। तीर्थे असती मनोहर ॥ २८ ॥ ‘पापविनाशी’ ‘काम्यतीर्थ’ । तिसरें सिद्ध ‘वरदतीर्थ’। अमरेश्वरसंनिधार्थ । अनुपम्य असे भूमंडळीं ॥ २९॥ पुढें संगम षट्‌कूळांत। ‘प्रयागतीर्थ’ असे ख्यात । ‘शक्तितीर्थ’ ‘अमरतीर्थ’ ‘कोटितीर्थ’ परियेसा ॥ ३० ॥

या तीर्थे असती अपरांपर। सांगतां असे विस्तार। याकारणें श्रीपादगुरुः। राहिले  तेथें द्वादशाब्दें ॥३१॥ कृष्णा वेणी नदी दोनी। पंचगंगा मिळोनि । सप्तनदीसंगम सगुणी। काय सांगू महिमा त्यांची ॥३२॥ ब्रह्महत्यादि महा पातकें। जळोनि जातीं स्नानें एकें। ऐसें सिद्धस्थान निकें। सकळाभीष्ट होय तेथें ॥३३॥ काय सांगू त्यांची महिमा। आणिक द्यांवया नाहीं उपमा। दर्शनमात्रं होती काम्या । स्नानफळ काय वर्णं ॥ ३४॥ साक्षात् कल्पतरु । असे वृक्ष औदुंबर। गोप्य होऊन अग्रोचरु। राहिले श्रीगुरु तया स्थानीं ॥ ३५॥

भक्तजनतारणार्थ। होणार असें तीर्थ ख्यात । राहिले तेथें श्रीगुरुनाथ। म्हणोनि प्रकट जाहले जाणा ॥ ३६॥ असतां पुढें वर्तमानीं। भिक्षा करावया प्रतिदिनीं। अमरापुर ग्रामीं। जाती श्रीगुरु परियेसा ॥ ३७॥ तया ग्रामीं द्विज एक । असे वेदाभ्यासक । त्याची भार्या पतिसेवक । पतिव्रताशिरोमणी ॥ ३८ ॥ सुक्षीण असे तो ब्राह्मण। शुक्लभिक्षा करी आपण। कर्ममार्गी आचरण। असे सात्विक वृत्तीनें ॥ ३९ ॥ तया विप्रमंदिरांत। असे वेल’ उन्नत । शेंगा निघती नित्य बहुत । त्याणें उदरपूर्ति करी ॥ ४० ॥

एखादे दिवशीं त्या ब्राह्मणासी । वरो न मिळे परियेसीं। तया शेंगांतें रांधोनि हर्षी। दिवसक्रमी येणेंपरी ॥४१॥ ऐसा तोब्राह्मण दरिद्री। याचकपणें उदर भरी। पंचमहायज्ञ कुसरीं। अतिथि पूजी भक्तीनें ॥४२॥ वर्ततां श्रीगुरु एकेदिवसीं। तया विप्रमंदिरासी। गेले आपण भिक्षेसी। नेलें विप्रं भक्तीनें ॥४३॥ भक्तिपूर्वक श्रीगुरूसी। पूजा करी तो षोडशी। घेवडे- शेंगा बहुवसी। केली होती पत्र-शाखा ॥ ४४॥ भिक्षा करून ब्राह्मणासी। आश्वासिती गुरु संतोषी। गेले तुझे दरिद्र दोषी। म्हणोनि निघती तये वेळीं ॥४५॥

तया विप्राचे गृहांत। जो का होता वेल उन्नत । घेवडा नाम विख्यात। आंगण सर्व वेष्टिलें असे ॥ ४६॥ तया वेलाचें झाडमूळ। श्रीगुरुमूर्ति छेदिती तात्काळ । टाकोनि देती परिबळें। गेले आपण संगमासी ॥ ४७॥ विप्रवनिता तये वेळीं। दुःख करिती पुत्र सकळी। म्हणती पहा हो दैव बळी। कैसें अदृष्ट प्या आपुलें ॥४८॥ आम्हीं तया यतीश्वरासी। काय उपद्रव केला त्यासी। आमुचा ग्रास छेदूनि कैसी। टाकोनि दिल्हा भूमीवरी ॥ ४९ ॥ ऐसेपरी ते नारी। दुःख करी नानापरी। पुरुष तिचा कोप करी। म्हणे प्रारब्ध प्रमाण ॥५०॥

म्हणे स्त्रियेसी तये वेळीं। जें जें होणार जया काळीं ॥ निर्माण करी चंद्रमौळी। तया आधीन विश्वजाण ॥५१॥ विश्वव्यापक नारायण। उत्पत्तिस्थितिलया कारण। पिपीलिकादी स्थूळ-जीवन । समस्तां आहार पुरवीतसे ॥५२॥ ‘आयुरन्नं प्रयच्छति। ऐसें बोले वेदश्रुति। पंचानन आहार हस्ती। केवीं करी प्रत्यहीं श्री ॥५३॥ चौऱ्यायशीं लक्ष जीवराशी। स्थूल सूक्ष्म समस्तांसी। निर्माण केलें आहारासी । मग उत्पति तद्नंतरें ॥ ५४॥ रंकरायासी एक दृष्टीं। करूनि पोषितो हे सर्व सृष्टि। आपुलें आर्जव बरवें वोखटी। तैसें फळ आपणासी ॥५५॥

पूर्वजन्मींचें निक्षेपण। सुकृत अथवा दुष्कृत जाण। आपुलें आपणचि भोगणें। यापुढिल्यावरी काय बोल ॥ ५६॥ आपुलें दैव असतां उणें। पुढिल्या बोलती मूर्खपणें। जें पेरिलें तेंचि भक्षणें। कवणावरी बोल सांगें ॥५७॥ बोल ठेविसी यतीश्वरासी। आपुलें आर्जव न विचारिसी। ग्रास हरितला म्हणसी। अविद्यासागरीं बुडोनि ॥५८॥ तो तारक आम्हांसी। म्हणोनि आला भिक्षेसी। नेलें आमुचें दरिद्रदोषी। तोचि तारील आमुतें ॥५९॥ येणेंपरी स्त्रियेसी । संभाषी  विप्र परियेसीं। काढोनि वेलशाखेसी। टाकिता झाला गंगेंत ॥ ६० ॥

तया वेलाचें मूळ थोरी। जें कां होतें आपुले द्वारीं। काढूं म्हणूनि द्विजवरीं। खणितां झाला तया वेळीं ॥ ६१ ॥ काढितां वेलमूळासी । लाधला कुंभ निधानेसीं। आनंद श्री जाहला बहुवसी। घेउनि गेला घरांत ॥ ६२॥ म्हणती नवल काय वर्तले। यतीश्वर आम्हां प्रसन्न झाले । म्हणोनि या वेला छेदिलें। निधान लाधलें आम्हांसी ॥ ६३॥ नर नव्हे तो योगीश्वर। होईल ईश्वरीअवतार। आम्हां भेटला दैन्यहर। म्हणती चला दर्शनासी ॥ ६४॥ जाऊनि संगमा श्रीगुरुसी। पूजाकरिती बहुवसी । वृत्तांत सांगती तयांसी। तये वेळीं परियेसा ॥६५॥

श्रीगुरु म्हणती तयासी। तुम्हीं न सांगणे कवणासी। प्रकट करितां आम्हांसी। नसेल लक्ष्मी तुमचे घरीं ॥ ६६॥ ऐसेपरी तया द्विजासी। सांगे श्रीगुरु परियेसीं। अखंड लक्ष्मी तुमचे वंशीं। पुत्रपौत्रीं नांदाल ॥ ६७॥ ऐसा वर लाधोन। गेली वनिता तो ब्राह्मण । श्रीगुरुकृपा ऐसी जाण । दर्शनमात्रं दैन्य हरे ॥ ६८ ॥ ज्यासी होय श्रीगुरुकृपा । त्यासी कैचें दैन्य पाप। कल्पवृक्ष-आश्रय करितां बापा। दैन्य कैचें तया घरीं ॥६९॥ दैवें उणा असेल जो नरु। त्याणें आश्रयावा श्रीगुरु। तोचि उतरेल पैलपारु। पूज्य होय सकळिकांसी ॥७०॥

जो कोण भजेल श्रीगुरु । त्यासी लाधेल इह-परु। अखंड लक्ष्मी त्याचे घरीं। अष्टैश्वर्ये नांदती ॥७१॥ सिद्ध म्हणे नामधारकासी। श्रीगुरुमहिमा असे ऐसी । भजावें तुम्हीं मनोमानसीं । कामधेनु तुझ्या घरीं ॥७२॥ गंगाधराचा कुमर। सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार। पुढील कथामृतसार। ऐका श्रोते एकचित्तें ॥७३॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारक संवादे अमरापुरमहिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः ॥ श्रीपादश्रीवल्लभ – नृसिंहसरस्वती-दत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ शुभं भवतु ॥

श्रीदत्तात्रेयाची आरती

जय तत्वज्ञाननिदान । अनसूयात्रिनंद । त्वत्पदपद्मावरून। पंचप्राण ओवाळीन ॥ धृ.॥ करिं कृपा मायबापा। वारी सर्व पापतापा। निजमार्ग करी सोपा। अनुकंपा पूर्ण करून ॥१॥

 जें अत्यद्भुत तव रूप। तें ह्या चित्तीं आपोआप। राहो जें कामकोप। उपशमवी प्रगटून ॥ २॥ तपश्चर्या हे आमुची। त्वत्स्मृती नित्य होवो साची। दुर्वासना मनाची। नुठवी हेंचि देई दान ॥ ३॥ 

गुण भावें तुझें गावें। अनासक्तिनें मीं वागावें। सत्संगा आदरावें। मज द्यावें हैं वरदान ॥ ४॥ अनुरक्ती त्वत्पदीं व्हावी। विषयीं विरक्ती व्हावी। कष्ट येतां धृती व्हावी। सेवा बरवी घे हातून ॥५॥ 

तार तत्सत्ब्रह्मापर्ण। असो संपूर्णाचरण। दृढ धरूं तव चरण। न मला त्वदन्यशरण || ६ ॥ 

जय जय तत्वज्ञाननिदान..।।

Gurucharitra Adhyay 18 /श्रीगुरुचरित्र १८वा अध्याय Download Pdf /श्रीगुरुचरित्र १८ वा अध्याय – Download Pdf

Gurucharitra Adhyay 18 /श्रीगुरुचरित्र १८वा अध्याय
Exit mobile version