सिद्धमंगल स्तोत्र Siddha Mangal Stotra
Siddha Mangal Stotra सिद्धमंगल स्तोत्र हा एक प्रसिद्ध संस्कृत स्तोत्र आहे, ज्यात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या श्री दत्तात्रेयांच्या प्रतिमेला वंदन केले जाते. हे स्तोत्र प्रेम, श्रद्धा, आणि आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेने देवाच्या चरणांचे वंदन करते. सिद्धमंगल स्तोत्राच्या पद्यांतरात साक्षात्कारी भगवान दत्तात्रेयांच्या दिव्य शक्तिशाली आणि कृपाळुतेची महिमा आणि उद्दिष्ट केले आहे.
सिद्ध मंगल स्तोत्र अत्यंत प्रभावी स्तोत्र
ह्या स्तोत्राचा नित्य पठणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
श्रीसिद्धमङ्गलस्तोत्रम्
श्रीमदनन्त श्रीविभूषित अप्पललक्ष्मीनरसिंहराज ।
जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव ॥ १॥
श्रीविद्याधरी राधासुरेखा श्रीराखीधर श्रीपाद ।
जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव ॥ २॥
माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपाद ।
जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव ॥ ३॥
सत्यऋषिश्वर दुहितानन्दन बापनार्यनुत श्रीचरण ।
जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव ॥ ४॥
सवितृकाठकचयनपुण्यफल भारद्वाजऋषिगोत्रसम्भव ।
जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव ॥ ५॥
दो चौपाती देव लक्ष्मिगणसङ्ख्याबोधित श्रीचरण ।
जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव ॥ ६॥
पुण्यरूपिणी राजमाम्बसुतगर्भपुण्यफलसञ्जात ।
जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव ॥ ७॥
सुमतीनन्दन नरहरीनन्दन दत्तदेव प्रभु श्रीपाद ।
जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव ॥ ८॥
पीठिकापुर-नित्यविहारा मधुमतीदत्ता मङ्गलरूपा ।
जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव ॥ ९॥
इति श्रीसिद्धमङ्गलस्तोत्रं सम्पूर्णम् ।
सिद्ध मंगल स्तोत्र PDF डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
Siddha Mangala Stotram in English
Srimadanata Sri Vibhooshita Appala Lakshmi Narasimharaajaa |
Jaya Vijayeebhava Digvijayeebhava Sri Madakhanda Sri Vijayeebhava || 1 ||
Sri Vidyaadhari Radhaa Surekha Sri raakheedhara Sreepadaa |
Jaya Vijayeebhava Digvijayeebhava Sri Madakhanda Sri Vijayeebhava || 2 ||
Maataa Sumati Vaatschalyaamruta pariposhita Jaya Sripadaa |
Jaya Vijayeebhava Digvijayeebhava Sri Madakhanda Sri Vijayeebhava || 3 ||
Satya Rusheeswara Duhitaanandana Baapanaaryanuta Sree Charanaa |
Jaya Vijayeebhava Digvijayeebhava Sri Madakhanda Sri Vijayeebhava || 4 ||
Savitrakaataka Chayana Punyaphala Bharadwaja Rushigotra Sambhavaa |
Jaya Vijayeebhava Digvijayeebhava Sri Madakhanda Sri Vijayeebhava || 5 ||
DoChowpaatee Dev Lakshmi Ghanasamkhyaa Bodhita Sree Charanaa |
Jaya Vijayeebhava Digvijayeebhava Sri Madakhanda Sri Vijayeebhava || 6 ||
Punyaroopinee Raajamaambasuta Garbhapunyaphala Samjaataa |
Jaya Vijayeebhava Digvijayeebhava Sri Madakhanda Sri Vijayeebhava || 7 ||
Sumateenandana Naraharinandana Dattadevaprabhu Sreepadaa |
Jaya Vijayeebhava Digvijayeebhava Sri Madakhanda Sri Vijayeebhava || 8 ||
Peethikaapura Nityavihaara Madhumati Datta, Mangalaroopaa |
Jaya Vijayeebhava Digvijayeebhava Sri Madakhanda Sri Vijayeebhava || 9 ||
|| श्रीपादराजमं शरणं प्रपद्ये ||
Siddha Mangal Stotra
सिद्धमंगल स्तोत्र Siddha Mangal Stotra : एक उज्ज्वल आणि पवित्र स्तोत्र
हे स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभांना समर्पित केले आहे, ज्याची कवितांतर साधी, सोपी, आणि सुरेख आहे. यात भगवान दत्तात्रेयांच्या चरणांची स्तुती, प्रार्थना, आणि श्रद्धांजली केली आहे. या स्तोत्राचे पठण मनाला शांतता आणि प्रसन्नता प्रदान करते.
सिद्धमंगल स्तोत्र हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सतराव्या अध्यायात हे स्तोत्र येते. ग्रंथकार शंकर भट म्हणतात,” श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी “सिद्धमंगल” स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहिल. या स्तोत्रात व्याकरण दृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधीनिषेध नाही. मला ते स्तोत्र श्री बापनाचार्युलूच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या ह्रदयावर अंकित झाले आहे.
परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करुन केल्यास सहस्त्र सदब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनतील सर्व कामना पुर्ण होतात. जे भक्त मन काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करुन या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात. तसेच याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रुपाने संचार करणार्या सिद्धी प्राप्त होतात.