Site icon swamisamarthsevekari.com

Swami Samarth Manas Puja Lyrics in Marathi | श्री स्वामी समर्थ मानस पुजा

Spread the love

Swami Samarth Manas Puja | स्वामी समर्थ मनास पूजेचे मुख्य घटक:

या साध्या परंतु प्रभावी पूजेमुळे भक्तांच्या जीवनात शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते.

Swami Samarth Manas Puja

नमो स्वामीराजम दत्तावताराम |
श्री विष्णू ब्रम्हा शिवशक्तिरूपम ||
ब्रह्मस्वरूपाय करूणाकाराय |
नमो नमस्ते ||

हे स्वामी दत्तात्रय हे कृपाळा |
मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||
कुठे माय माझी म्हणे बाळ कैसा |
समर्थ तुम्हाविना हो जीव तैसा ||

स्वामी समर्थ तुम्ही स्मर्तगामी |
हृदयसानी या बस प्रार्थितो मी ||
पूजेचे यथासांग साहित्य केले |
मखरात स्वामी गुरु बैसले ||

महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती |
जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती ||
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ |
परब्रम्ह साक्षात गुरुदेव दत्त ||

सुवर्ण ताटी महारातन ज्योती |
ओवाळुनि अक्षता लावू मोती ||
शुभारंभ एस करुनि पूजेला |
चरणावरी ठेवू या मस्तकाला ||

हा अर्घ्य अभिषेक स्वीकारी माझा |
तुझी पद्य पुजा करी बाळ तुझा ||
प्रणिपात साष्टांग शरणागताचा |
तुम्हा वाहिला भर या जीवनाचा ||

हि ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा |
शिव शंकराची असे शक्तिपूजा ||
दही दूध शुद्धहोदकाने तयाला |
पंचामृती स्नान घालू प्रभूला ||

वीणा तुताऱ्या किती वाजताती |
शंखादि वाद्ये पहा गर्जताती ||
म्हणती नगारे गुरुदेव दत्त
श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ ||

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली |
श्री दत्त स्वामी सी या स्नान घाली ||
महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया |
महिमा तयांचा काळात जगा या ||

मी धन्य झालो हे तिथे घेता |
घडू दे पूजा हि यथासांग आता ||
अजानुबाहू भव्य कांती सतेज |
नसे मानवी देह हा स्वामी राज ||

प्रत्यक्ष श्रीसद्गुरू दत्तराज |
तथा घालूया रेशिमी वस्त्रसाज ||
सुगंधित भाळी तिला रेखियला |
शिरी हा जरी टोप शोभे तयाला ||

वक्ष स्थळी लाविल्या चंदनाचा |
सुवास तो वाढावी भाव साचा ||
शिरी वाहूया बिल्व तुलसी दलाते |
गुलाब जय जुई अत्तराते ||

गंधाक्षता वाहुनी या पदाला |
हि अर्पूया जीवन पुष्पमाला ||
चरणी करांनी मिठी मारू देई |
म्हणे लेकरांसी सांभाळ आई ||

इथे लावया केशर कस्तुरीचा |
सुगंधी हा खूप नाना प्रतीचा ||
पुष्पांजली हि तुम्हा अर्पियेली |
गगनातुनी पुष्पवृष्टी जहाली ||

करुणावतारी अवधूत कीर्ती |
दयेची कृपेची जशा शुद्ध मूर्ती ||
प्रभा काकली शक्तीच्या मंडलाची |
अशी दिव्यता स्वामी योगेश्वरांची |

हृदयमंदिरांची हि स्नेह्ज्योती |
मला दाखवी स्वामींची योगमूर्ती ||
करू आरती आर्तभावे प्रभूची |
गुरुदेव स्वामी स्वामी दत्तात्रयाची ||

पंचारती हि असे पंचप्राण |
ओवाळुनि ठेवू चरणांवरून ||
निघेना शब्द बोलू मी तोही |
मनीचे तुम्ही जनता सर्व काही ||

हे स्वामीराजा बस भोजनाला |
हा पंच पक्वान्न नैवेद्य केला ||
पुरांची पोळी तुम्हा आवडीची |
लाडू कारंजी असे हि खव्याची ||

डाळिंब, द्राक्षे, फळे आणि मेवा |
हे केशरी दूध घ्या स्वामी देवा ||
पुढे हात केला या लेकराने |
प्रसाद द्यावा आपुल्या कराने ||

तांबूल घ्यावा स्वामी समर्था |
चरणांची सेवा करू द्यावी आता ||
प्रसन्नतेतून मागू मी काय |
हृदयी ठेव माते तुझे दोन्ही पाय ||

सर्वस्व हा जीवच चरणी ठेवू |
दुजी दक्षिण मी तुम्हा काय देऊ ||
नको दूर लोटू आपुल्या मुलासी |
कृप छत्र तुमचेच या बालकासी ||

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला |
पदी ठेवू शीर शरणांगतला ||
हृदयी भाव यावे असे तळमळीचे |
करो पूर्ण कल्याण जे या जीवाचे ||

तुझे बाळ पाही तुझी वाट देवा |
नका वेळ लावू कृपा हसत ठेवा ||
मणी पूजनाची अशी दिव्य ठेव |

वसो माझिया अंतरी स्वामी देव ||
| वसो माझ्या अंतरी स्वामी देव |
वसो माझ्या अंतरी स्वामी देव ||


स्वामी समर्थ मनास पूजा कसे करावी? Swami Samarth Manas Puja

श्री स्वामी समर्थ मनास पूजा ही अत्यंत शक्तिशाली आणि आनंददायक पूजा आहे. ती म्हणजे मनातल्या स्थितीस स्वामी समर्थांच्या प्रतिमेचा पूजन विचारले जाते. या पूजेला अत्यंत महत्त्व दिला जातो आणि त्यात श्रद्धा आणि भक्ती असलेल्या मनाचा समावेश होतो.

हे पन वाचा


Swami Samarth Manas Puja स्वामी समर्थ मनास पूजा

स्वामी समर्थ मनास पूजा ही एक अत्यंत प्रभावी आणि साधी पूजा आहे, जी मन, शरीर आणि आत्म्याला शांती व समृद्धी प्रदान करते. स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे प्रसिद्ध संत आहेत, ज्यांची उपासना अनेक भक्तांद्वारे श्रद्धेने केली जाते. मनाच्या शुद्धीकरणासाठी आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या मनातील चिंता, ताणतणाव आणि नकारात्मक विचार दूर होतात. या पूजेत मंत्र जप, ध्यान आणि स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येते, ज्यामुळे भक्तांना त्यांच्या आशीर्वादाचा अनुभव येतो.

Exit mobile version