अक्कलकोट स्वामींच्या प्रार्थनेचे फायदे आणि विधी Akkalkot Swami Stotra
Akkalkot Swami Stotra अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने भक्तांना मानसिक शांती, आत्मविश्वास, आणि शारीरिक आरोग्य प्राप्त होते. या स्तोत्राच्या पठणाने जीवनातील अडचणी आणि संकटे दूर होतात.
पूजाविधी:
- स्नान: स्वच्छतेने स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावीत.
- पूजा स्थळ: स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर स्वच्छ जागी आसनावर बसा.
- दीप प्रज्वलन: दिवा लावा आणि उदबत्ती लावा.
- फुले आणि फळे: स्वामींना फुले आणि फळे अर्पण करा.
- स्त्रोत पठण: संपूर्ण भक्तिभावाने अक्कलकोट स्वामी स्तोत्राचे पठण करा.
- प्रसाद: पूजेच्या शेवटी प्रसाद वाटप करा.
या प्रकारे नियमितपणे अक्कलकोट स्वामींची पूजा आणि स्तोत्राचे पठण केल्याने स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने जीवनात सर्व प्रकारची सुख-समृद्धी प्राप्त होते. Akkalkot Swami Stotra.
Akkalkot Swami Stotra
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: |
ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||
नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||
नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||
थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||
श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||
नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक || ६||
त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||
म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||
कुर्हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||
एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||
मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||
खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||
दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||
नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||
दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||
यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||
काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला | जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||
पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||
तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||
स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||
पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||
तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||
अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी | भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||
नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||
स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार | कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||
ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||
सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद | झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||
स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||
जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||
कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||
ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||
अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||
सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी | म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||
न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||
दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||
स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||
मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी | सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||
ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं | मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||
तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा | ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९
संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी | तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना || ४० ||
तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी | आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला || ४१ ||
अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं | ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||
स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी | आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||
पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||
भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||
वेदांताचा अर्थ लाविला | पंडितांचा ताठा जिरविला | भाविक भक्तांना दिधला | धीर अनेक संकटी || ४६ ||
स्वामी तुमचे चरित्र आगळें | अतर्क्य अलौकिक जगावेगळे | त्यांत प्रेमाचे सागर सांठले | धन्य धन्य ज्यांना उमजलें ते || ४७ ||
बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी | लहान मोठ्या अधिकार्यांनी | गरीबांपासून श्रीमंतांनी | सेवा केली यथाशक्ती || ४८ ||
जे जे तुमच्या भजनीं लागले | त्यांचे त्यांचे कल्याण झालें | हवें हवें ते सारें मिळाले | श्री समर्थ कृपेनें || ४९ ||
पुढे संपल्या लीला संपले खेळ | ताटातुटीची आली वेळ | स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ | परब्रह्म्यांत मिळालें || ५० ||
शके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी | चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी | पुण्य घटिका तिसर्या प्रहरी | स्वामी गेले निजधामा || ५१ ||
बोलता बोलता आला अंतकाळ | प्रकृतीत झाली चलबिचल | क्षणात पापण्या झाल्या अचल | निजानंदी झाले निमग्न || ५२ ||
वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर | पांचवा दिवस शनिवार | स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर | दिलें दर्शन भाऊसाहेबांसी || ५३ ||
ऐसा यती दत्त दिगंबर | संपवूनी आपूला अवतार | निजधामा गेला निरंतर | भक्त झाले पोरके || ५४ ||
बातमी जेव्हा सर्वत्र पसरली | जनता शोकाकुल झाली | सर्व भक्तमंडळी हळहळली | अन्नपाणीही सुचेना || ५५ ||
गावोगांवीची भक्तमंडळी | अक्कलकोटी गोळा झाली | समर्थांची समाधी पाहिली | आपल्या साश्रू नयनांनी || ५६ ||
चवथा अवतार संपला | तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला | अक्कलकोट पुण्यभूमीला | क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें || ५७ ||
अजूनही जे येती समाधीदर्शना | त्यांच्या व्याधी आणी विवंचना | संकटे आणी दु:खे नाना | स्वामी दूर करतात || ५८ ||
याचे असती असंख्य दाखले | अनेकांनी अनुभवले | म्हणूनी महाराजांची पाऊले | आपणही वंदूंया || ५९ ||
नम्र होउनी त्यांचे चरणीं | कळकळने करुंया विनवणी | स्वामींना यावी करुणा म्हणूनी | प्रार्थना त्यांना करुंया || ६० ||
जयजय दत्ता अवधूता | अक्कलकोट स्वामी समर्था | सदगुरु दिगंबरा भगवंता | दया करी गा मजवरी || ६१ ||
अनेकांच्या संकटी आला धावून | आता माझी प्रार्थना ऐकून | समर्थराया देई दर्शन | दूर लोटु नको मला || ६२ ||
व्यवहारी मी जगतो जीवन | अनेक पापें घडती हातून | तव नामाचें होते विस्मरण | क्षमा याची असावी || ६३ ||
सदगुरुराया कृपा करावी | तुमची सेवा नित्य घडावी | ऐसी बुध्दी मजला द्यावी | पापे सर्व पळावी || ६४ ||
सुखाचें व्हावे जीवन ऐहिक | धनदौलत मिळावी, मिळावे पुत्रपौत्रसुख | गृहसौख्य आणी वाहनसुख | अंती सदगति लाभावी || ६५ ||
तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा | म्हणुनी याचना करतों देवा | उदार मनाने वर द्यावा | आणी तथास्तु म्हणावे || ६६ ||
तुमची होतां कृपा पूर्ण | जीवन माझें होईल धन्य | म्हणुनी आलों तव पायी शरण | दत्तराया दयाघना || ६७ ||
मी एक मानव सामान्य | तुमची सेवा नित्य घडावी म्हणून | या पोथीचें करितों वाचन | दान द्या तुमच्या कृपेचे || ६८ ||
वेडीवाकुडी माझी सेवा | स्वीकारावी स्वामी देवा | वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा | हीच अंती विनंती || ६९ ||
शके अठराशे नव्याण्ण्व वर्षी | चैत्रमासीं शुक्लपक्षी | शुभ रामनवमी दिवशी || पोथी पूर्ण झाली ही || ७० ||
स्वामींचे चित्र ठेऊनी पुढ्यांत | किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत | बसुनी ही पोथी वाचावी मनांत | इच्छा सफल होईल || ७१ ||
माणिकप्रभू , साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोट्चे दिगंबर | एकाच तत्वाचे तीन अविष्कार | भेद त्यांत नसे मुळी || ७२ ||
एकाची करितां भक्ती | तिघांनाही पावते ती | ऐसी ठेऊनी आपली वृत्ती | पोथी नित्य वाचावी || ७३ ||
या पोथीचे करितां नित्य पठण | प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न | करतील सर्व मनोरथ पूर्ण | सत्य सत्य वाचा ही || ७४ ||
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु || शुभं भवतु || ॐ शांति:शांति:शांति: || (ओवी संख्या ७४ )
|| ” श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र —माहात्म्य सम्पूर्ण ” ||
श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र Akkalkot Swami Stotra : आध्यात्मिक शक्तीची आशीर्वादे
Akkalkot Swami Stotra अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज हे एक अत्यंत प्रमुख आध्यात्मिक संत आणि भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आवडीने गुरु मानले जाते. त्यांची उपासना व अनुयायींनी अत्यंत श्रद्धांजली आणि भक्तिभावाने केली जाते. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी प्रत्येक भक्ताने स्तोत्र पठण केल्याने मनात शांती व आत्मविश्वास जागतात.
Akkalkot Swami Stotra अक्कलकोट स्वामींच्या स्तोत्राचे महत्त्व
अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या स्तोत्राचे पाठ करण्याचे अत्यंत महत्त्व आहे. ह्या स्तोत्राचे पठण केल्याने भक्तांना मानसिक शांती, आत्मविश्वास, आणि आध्यात्मिक उन्नती होते. स्तोत्र पठणाने जीवनातील सर्व प्रकारच्या संकट आणि अडचणी समाधान होतात.
अक्कलकोट स्वामी स्तोत्राचे लाभ
- मानसिक शांती: स्तोत्र पठण केल्याने मनात शांतता व स्थिरता येते.
- आत्मविश्वास: अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र पठण केल्याने आत्मविश्वास मजबूत होते.
- आरोग्य: स्तोत्राचे पठण केल्याने शारीरिक आरोग्य वाढते आणि रोगांची दूरी होते.
- आध्यात्मिक उन्नती: अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र पठण केल्याने आध्यात्मिक उन्नती होते.
स्तोत्र पठणाची योग्य पद्धत
स्तोत्र पठण करताना योग्य पद्धत पालणे आवश्यक आहे:
- वेळ आणि स्थान: सकाळ आणि संध्याकाळी शांत स्थानावर बसून पठण करा.
- पूजेची तयारी: पान, सुपारी, तिळ, जल, चंदन, फळे, फुले, तुलसी, आणि धन हातात घेऊन संकल्प करा.
- मन एकाग्रता: मन शांत ठेवून ध्यान धरा आणि स्तोत्राचे पठण करा.
श्री स्वामी समर्थांचे भक्तिमार्ग
swami samarth stotra श्री स्वामी समर्थांच्या भक्तांनी त्यांच्या कृपेमुळे अनेक चमत्कार अनुभवले आहेत. या काही कथा आणि अनुभवांमुळे भक्तिमार्गाचा महत्त्व पटतो:
- संकटातून मुक्तता: अनेक भक्तांनी त्यांच्या जीवनातील संकटांपासून मुक्तता मिळवली आहे.
- आध्यात्मिक जागृती: स्वामी समर्थांच्या कृपेमुळे भक्तांनी आत्मसाक्षात्काराची अनुभूती घेतली आहे.
श्री स्वामी समर्थांचे प्रमुख स्थळे
स्वामी समर्थांचे दर्शन आणि पूजेसाठी काही प्रमुख स्थळे आहेत:
स्थळाचे नाव | स्थान |
---|---|
अक्कलकोट मंदिर | अक्कलकोट, महाराष्ट्र |
श्री स्वामी समर्थ मंदिर | पुणे, महाराष्ट्र |
श्री स्वामी समर्थ मंदिर | मुंबई, महाराष्ट्र |
श्री स्वामी समर्थांवरील लोकप्रिय स्तोत्रे आणि भजन
swami samarth stotra श्री स्वामी समर्थांवरील अनेक लोकप्रिय स्तोत्रे आणि भजन आहेत. या स्तोत्रांचा नियमित उच्चार केल्याने भक्तांच्या मनातील श्रद्धा वाढते. काही लोकप्रिय स्तोत्रे आणि भजन:
निष्कर्ष
Swami Samarth Stotra श्री स्वामी समर्थ स्तोत्राचे नियमित पठण केल्याने भक्तांना मानसिक शांती, आध्यात्मिक प्रगती, आणि संकटातून मुक्तता मिळते. या स्तोत्राचे महत्त्व आप
हे देखील वाचा: Krishna-aarti-in-marathi
It’s very easy to find out any topic on web as compared to books, as I
found this post at this website.
Also visit my web page: nordvpn coupons inspiresensation (t.co)
350fairfax nordvpn special coupon code 2025
My brother recommended I might like this website.
He was entirely right. This post truly made my day. You cann’t imagine
just how much time I had spent for this info! Thanks!
Hello to every one, it’s really a pleasant for
me to visit this web page, it contains precious
Information.
My web site; Vpn
Have you ever considered about including a little bit
more than just your articles? I mean, what you say is valuable and
all. However just imagine if you added some great pictures or videos to give your posts
more, “pop”! Your content is excellent but with pics and video
clips, this blog could undeniably be one of the most beneficial in its niche.
Very good blog! https://tinyurl.com/23mmjj8a gamefly free trial